जनता राजा मानत नसली तरी लोक राज्याभिषेक करवून घेतात (छत्रपती शिवाजी महाराजांनी) संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
जनता राजा मानत नसली तरी लोक राज्याभिषेक करवून घेतात
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
लोकसत्ता टीम | June 5, 2020 01:07 am

संग्रहित छायाचित्र
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
नागपूर : आजकाल जनता राजा मानत नसली तरी लोक स्वत:हून राज्याभिषेक करवून घेतात. शिवाजी महाराजांनी कधी असा स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला नाही. त्यानंतर देशाच्या इतिहासात गतिमान परिवर्तन झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराच्यावतीने हिंदू साम्राज्य दिनोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेचा विचार करून हिंदू राष्ट्र निर्माण केले. राज्यव्यवस्थेचे उत्तम उदाहरण म्हणून शिवरायांच्या राज्य कारभाराकडे पाहता येते. त्यांनी राज्याची व्यवस्था कशी चालवावी याची ब्ल्यूप्रिंट तयार केली. त्यांच्या राज्यव्यवस्थेचा आज शासन करणाऱ्या प्रत्येकाने अभ्यास करणे गरजेचे आहे.
छत्रपतींच्या राज्यव्यवस्थेत कधीही भेदभाव झाला नाही म्हणून आजही त्यांच्या राज्यव्यवस्थेवर जनतेचा विश्?वास आहे. महिलांवर अत्याचार करणारे, शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्यांना त्याकाळी कठोर शासन व्हायचे. मातृभूमी आणि हिंदू राज्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. राज्याचे नेतृत्व करणाऱ्याला परिस्थितीचे आकलन करता आले पाहिजे, तितका आत्मविशास व साहस त्याच्यात असावे.
लक्ष्य गाठण्यासाठी मनात श्रद्धा असावी लागते. व्यक्ती जोपर्यंत श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत तो पुरुषार्थ गाजवू शकत नाही, असे जोशी म्हणाले.
Comments
Post a Comment